This Blog
This Blog
 
 
 
 
 
'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

बांगलादेशातील हिंदूंसाठी कार्यरत असणारे डॉ. बेनकिन यांना अमेरिकेतील...

बांगलादेशातील हिंदूंसाठी कार्यरत असणारे डॉ. बेनकिन यांना अमेरिकेतील हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्यापासून परावृत्त करण्याचा मुसलमानाचा डाव !
   वॉशिंग्टन, २९ जून (वार्ता.) - `फोरम फॉर हिंदु अवेकनिंग' या संस्थेने आयोजित केलेली हिंदु धर्मजागृती सभा नुकतीच अमेरिकेतील शिकागो येथे पार पडली. या सभेला बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते डॉ. रिचर्ड बेनकिन यांनी मार्गदर्शन केले. सभेच्या काही दिवस आधी डॉ. बेनकिन यांना सभेत उपस्थित रहाण्यापासून परावृत्त करणारी ३ संगणकीय पत्रे खलीद आझम नामक मुसलमानाने पाठवली.
(जगभरात कुठेही हिंदूवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणार्‍या हिंदुत्ववाद्यांचा आवाज बंद करण्यासाठी मुसलमान कशी तत्परतेने कृती करतात, हे यातून दिसून येते. हिंदू संघटित झाले नाहीत, तर आज `हिंदूंच्या सभांना उपस्थित राहू नका', असे साध्या भाषेत सांगणारे उद्या उघड धमक्या देतील, तर काही दिवसांनी हिंदुत्ववाद्यांना मारहाण करायलाही मागे-पुढे बघणार नाहीत. हिंदूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन ! - संपादक) आझम हे अमेरिकेतील `इंडियन मुस्लीम कौन्सिल, युएस्ए' आणि `इंडियन मुस्लीम रिलिफ अँण्ड चॅरिटी' या संघटनांशी निगडित आहेत. (हिंदुत्ववादी संघटनांवर तसेच त्यांच्या कार्यक्रमांवर मुसलमान बारीक नजर ठेवून असतात, हे यातून दिसून येते ! - संपादक)

हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या विरोधात खोटे दाखले देऊन त्यांची अपकीर्ती करणारे आझम !
    डॉ. बेनकिन हे ज्यू धर्मीय आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात हिंदुत्ववाद्यांविषयी मत कलुषित करण्यासाठी आझम यांनी `हिंदुत्ववादी कसे हिटलरवादी आहेत', हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्‍न केला. (हिंदूंना साहाय्य करणार्‍यांना पद्धतशीरपणे फोडण्यासाठी कार्यरत असणारे कावेबाज मुसलमान ! - संपादक) या सभेला हिंदु स्वयंसेवक संघाचे (ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आहे) श्री. श्रीनारायण चांडक यांना निमंत्रित करण्यात आले होते. `राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी गांधीची हत्या केली होती. संघ हा हिटलरचा समर्थक असून त्याने ज्यूंच्या वंशविच्छेदाचे समर्थन केले आहे', असे आझम यांनी डॉ. बेनकिन यांना पाठवलेल्या संगणकीय पत्रात म्हटले होते. (गांधींच्या हत्येमागे संघाचा हात नव्हता. संघाने हिटलर अथवा ज्यूंचा वंशविच्छेद यांविषयी समर्थन केल्याचा उल्लेख इतिहासात कुठेही आढळत नाही. असे असतांना जगभरातील मुसलमान नेते हिंदुत्ववादी संघटनांना कसे पद्धतशीरपणे बदनाम करत आहेत, हे या पत्रातून दिसून येते. - संपादक)
या संगणकीय पत्रामध्ये सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे कसे हिटलरचे समर्थक होते, याविषयी माहिती सांगणारी संकेतस्थळावरील `लिंक' आझमी यांनी संगणकीय पत्रात जोडली होती. (इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कुठेही हिटलरचा उदोउदो केल्याचे नमूद नाही. असे असतांनाही त्यांच्याविषयी खोटी माहिती संकेतस्थळांवर प्रसिद्ध करून ती प्रसारित करण्याचा मुसलमानांकडून कट रचला जात आहे. बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांनी याची दखल घ्यावी, अशी हिंदूंना अपेक्षा आहे ! - संपादक)

हिंदुत्ववाद्यांची अपकीर्ती करणार्‍यांना सडेतोड उत्तर देणारे डॉ. बेनकीन !
    सरसंघचालक गोळवलकर आणि स्वातंत्र्यवादी सावरकर यांना `हिटलरवादी' ठरवणार्‍या आझम यांना डॉ. बेनकिन यांनी अरबी राष्ट्रांचे `हिटलर प्रेम' उदाहरणासहीत दाखवून दिले. अनेक अरब देशांनी नाझी नेत्यांना आश्रय दिला. काही देशांनी तर नाझींना त्यांच्या लष्करातील उच्चपद बहाल केले. `मध्य पूर्वेत वास्तव्य करणार्‍या ज्यूंचा वंशविच्छेद करावा', अशी विनंती हाज अमीन अल् हुसैनी या मुसलमान नेत्याने  हिटलरकडे केली होती. या नेत्यांचा आझम तसेच इतर मुसलमान का निषेध करत नाही, असे डॉ. बेनकिन यांनी संगणकीय पत्र पाठवून प्रतिप्रश्‍न केल्यावर आझम यांनी डॉ. बेनकिन यांना संगणकीय पत्रे पाठवणे बंद केले.

 
Copyright © 2010 Dainik Sanatan Prabhat Contact Us : dainik@sanatan.org